महिमा बाळूमामांचा... बाळूमामांचा जन्म कुठचा? आदमापुरात ते कसं आले? पाहा संपूर्ण कहाणी!
विजय केसरकर, एबीपी माझा | 12 Sep 2021 11:38 PM (IST)
लोकसंत अशी ओळख असलेले बाळूमामा यांच्या भक्तात सध्या चांगलाच बेबनाव सुरु झाला असून बाळूमामांच्या नावावर काही मंडळी पैसे गोळा करीत असल्याने त्यांच्या निषेधाचा ठराव बाळूमामांचे समाधिस्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अदमापूर या गावाने केला आहे. बाळूमामा यांच्या जीवनावरील मालिका सध्या टीव्हीवर जोरात सुरु असल्याने बाळूमामा यांच्याबाबत मोठी उत्सुकता सर्वसामान्य भक्तांमध्ये निर्माण होत आहे.