Assam Mizoram : आसाम-मिझोरामधला वाद कशामुळे? दोन राज्यांच्या सीमेवर गोळीबार, केंद्राकडे लक्ष
प्रशांत कदम, एबीपी माझा | 27 Jul 2021 11:55 PM (IST)
गुवाहाटी : आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये सीमावादावरुन संघर्ष पेटला असून त्याने हिंसक रुप धारण केलं आहे. नागरिक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या झडपेमध्ये गोळीबाराची घटना घडली असून त्यामध्ये सहा पोलीस कर्मचारी मृत्यूमुखी पडले आहेत तर 50 कर्मचारी जखमी झाले आहेत. या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये सुरु असलेल्या वादावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली असून दोन्ही राज्यांनी सीमेवर शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं आहे.