Walmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSantosh Deshmukh Murder Case Walmik Karad Kej Court Beed: बीड जिल्ह्यातील केज न्यायालयानं खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत महत्वाचा निर्णय दिला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावला आहे. कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. खंडणी प्रकरणाबाबात वाल्मिक कराडलाआज बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
दरम्यान, खंडीणीबाबत वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपली आहे. त्यानंतर आज केज न्यायालयात वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. तसेच 14 दिवसांची न्यायालयीनं कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळंया प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात यावा अशी मागणी अनेक राजकीय नेत्यांनी केली होती. त्यानंतर आज अखेर वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. त्यामुळं वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला होता. मात्र वाल्मिक कराडची यातून सुटका झाली होती. मात्र, आज कराडवर मकोका लावण्यात आला आहे.
दरम्यान, मुलासाठी आईची तळमळ पाहायला मिळाली. कराडच्या आईने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं.