Vadettiwar VS Padalkar : वडेट्टीवार वि. पडळकर 'जुगलबंदी', आरोप सिद्ध करा, अन्यथा 50 कोटींचा दावा!
सारंग पांडे, एबीपी माझा
Updated at:
07 Sep 2021 11:20 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविजय वडेट्टीवार आणि गोपीचंद पडळकर वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीने आज पडळकर यांच्या विरोधात आंदोलन केले. गिरनार चौकात पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काँग्रेस कार्यकर्त्यानी चपलांचा मार दिला. सोबतच शाई टाकून पुतळ्याला काळे फासत पडळकर यांच्या विधानाचा निषेध केला. विजय वडेट्टीवार यांनी दारू कारखाने विकत घेतल्यावर चंद्रपूरची दारूबंदी नियोजनबद्धरित्या उठविल्याचा आरोप पडळकर यांनी केला होता. तर यावर उत्तर देताना मंत्री वडेट्टीवार यांनी आरोप सिद्ध करा अन्यथा 50 कोटींचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला होता.