Thackeray vs Modi : गर्व, अहंकार ते भ्रष्टाचार; उद्धव ठाकरे यांनी घेतला मोदींचा समचार Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThackeray vs PM Modi : गर्व, अहंकार ते भ्रष्टाचार; उद्धव ठाकरे यांनी घेतला मोदींचा समचार Special Report
Maharashtra Politics : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) नसते, तर मोदी (PM Modi) कचऱ्याच्या डब्यात असते, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील सभेत संबोधन करताना पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर, मोदीच दिसले नसते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
...तर, मोदी कचऱ्याच्या डब्यात असते
मोदींचे फोटो लावून जिंकल्याचा भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ज्यावेळी मोदी नाव कुणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो. शिवसेनाप्रमुख होते, म्हणून मोदी तुम्हाला दिसतायत, आम्हाला काय सांगताय मोदींचं कौतुक. आम्हाला आमचे कट्टर शिवसैनिक आणि जीवाला जीव देणारे कट्ट्रर मावळे पुरेसे आहेत. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या पेटीत टाकायला निघाले होते, तेव्हा हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर, मोदीच दिसले नसते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार घणाघात केला आहे. बाळासाहेबांनी जो पक्ष स्थापन केला, त्या पक्षाच्या शिवसैनिकाला जिंकण्यासाठी मोदींची गरज लागेल का, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.