Uddhav Raj Thackeray Meet : अडीच तास खलबतं, BMC निवडणुकीसाठी युतीची चर्चा? Special Report
abp majha web team Updated at: 10 Sep 2025 09:50 PM (IST)
बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी अडीच तास भेट दिली. खासदार संजय राऊत यांनी ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगितले असले तरी, राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकांसाठी युतीची प्राथमिक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. युतीची रणनीती, मुद्दे आणि जागा वाटपावर चर्चा झाली, मात्र घोषणेचा मुहूर्त ठरलेला नाही. या भेटीनंतर मनसेने गुरुवारी सकाळी शिवतीर्थावर बैठकीचे आयोजन केले आहे. भाजप नेत्यांनी शुभेच्छा दिल्या, पण महायुतीवर परिणाम होणार नसल्याचे म्हटले. काँग्रेसने मनसेशी वैचारिक मतभेद असल्याचे म्हटले, तर शरद पवार यांचा पक्ष युतीच्या बाजूने असल्याचे संकेत मिळत आहेत. "राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो," असे म्हटले जाते. दोन्ही पक्षांना नवसंजीवनीची गरज असल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवे समीकरण उदयास येणार का, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.