Wardha Snake Bite : सर्पदंश झालेल्या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर, झोपेत असताना गळ्याभोवती नाग!
रजत वशिष्ठ, एबीपी माझा | 12 Sep 2021 08:17 PM (IST)
वर्धा : वर्ध्याच्या सेलू तालुक्यात बोरखेडकी काळजकाचा ठोका चुकवणारी घटना घडली. मध्यरात्री सापाचा आवाज आल्याने जेव्हा आई वडील उठले तेव्हा मुलीच्या गळ्यात साप दिसून आला. काय करावे सुचत नसताना मुलीला जाग आली, तिला हालचाल करू नको असे सांगितले आणि सर्पमित्राला बोलावले, पण सर्पमित्र आला नाही, तोपर्यंत मुलीने हालचाल केली आणि सापाने दंश केला, मुलीला सेवाग्राम रुग्णलायत नेण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. दिव्यांनी पद्माकर गडकरी असे सात वर्षीय मुलीचे नाव आहे.