Raj Uddhav Thackeray on Hindi : दोन ठाकरे, एकच मोर्चा? आता झेंडा नाही, फक्त अजेंडा? Special Report
प्रसाद यादव | 26 Jun 2025 09:46 PM (IST)
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात वादाचा गजर सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चे काढण्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे 5 जुलैला तर उद्धव ठाकरे 7 जुलैला मोर्चा काढणार आहेत. ठाकरे बंधूंनी सरकारच्या त्रिभाषा सूत्राच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन सरकारची भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी पक्षाने ठाकरे सरकारच्या काळात माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारल्याचा दावा केला आहे.