Shiv Sena UBT MNS Nashik Morcha : नाशिकमध्ये ट्रेलर, दसऱ्याला पिक्चर? Special Report
abp majha web team | 12 Sep 2025 09:50 PM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठींचा सिलसिला वाढला आहे. येत्या दसरा मेळाव्यात दोन्ही ठाकरेंचे पक्ष युतीचे तोरण बांधणार का, याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेच्या शिलेदारांनी एकत्रित मोर्चा काढला. नाशिकमधील बिघडलेली कायदा सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, सट्टा, जुगार आणि MD Drugs च्या प्रकरणांविरोधात हा मोर्चा होता. या मोर्चात दोन्ही पक्षांतील स्थानिक कार्यकर्ते आणि दिग्गज नेते सहभागी झाले होते. "दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरांच्याच मागे जाईल हा सुद्धा नाशिकनं संदेश दिलेला आहे," असे या मोर्चातून संकेत देण्यात आले. आदित्य ठाकरेंनीही "जिथेजिथे भ्रष्टाचार असेल तिथेतिथे दोन्ही पक्ष एकत्रच प्रहार करतील" अशी गर्जना केली. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे आणि नाशिक महानगरपालिकांमध्ये शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. नाशिकमधून आगामी महापालिका निवडणुकांसाठी युतीची चाहूल लागली आहे.