Farmers Protest : सांगता... ऐतिहासिक आंदोलनाची! शेतकरी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती
abp majha web team | 09 Dec 2021 10:31 PM (IST)

Farmers Protest Called Off : तब्बल 378 दिवस सुरु असलेलं ऐतिहासिक शेतकरी आंदोलन (Farmers Protest) स्थगित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून गुरुवारी शेतकरी आंदोलन (Farmers Protest) संपवण्याची घोषणा करण्यात आली. यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कृषी सचिवांच्या स्वाक्षरीने शासनाकडून पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.