Swimmer Tanvi Chavan Deore : इंग्लिश खाडी पार करणारी महाराष्ट्राची 'सागरकन्या' Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSwimmer Tanvi Chavan Deore : इंग्लिश खाडी पार करणारी महाराष्ट्राची 'सागरकन्या' Special Report
स्वप्नांना जिद्दीची साथ लाभली की विक्रम घडतोच..आणि असाच विक्रम घडवलाय नाशिकच्या तन्वी चव्हाण-देवरे यांनी.. लहानपणापासून पोहण्याची आवड असलेल्या तन्वी यांनी थेट इंग्लीश खाडी पार केली आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. दोन लेकरांची आई असलेल्या तन्वी यांच्या या स्वप्नपूर्तीच्या प्रवासासंदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट..
इंग्लिश खाडी पार करणारी पहिली भारतीय आई
तन्वी चव्हाण-देवरेंचा नवा विक्रम
डोव्हर ते फ्रान्सचा टप्पा पार करणारी 'सागरकन्या'
४२ किमीचा प्रवास १७ तास ४२ मिनिटांत पार
समुद्राच्या लाटा ते स्वप्नांचा किनारा
दोन लेकरांच्या या आईने
आपला छंद १८ वर्षांनंतर पुन्हा नव्याने जोपासला
आणि या छंदाचं विक्रमात रुपांतर झालं...
स्वप्न तन्वी यांचं पूर्ण झालं
पण अभिमानाने उर भरुन आलाय
तो अख्ख्या महाराष्ट्राचा
आणि म्हणूनच तिचं नाशिक स्टाईलने जल्लोषात स्वागत करण्यात आलं
समुद्राच्या लाटा पार करुन
स्वप्नांचा किनारा गाठणाऱ्या
तन्वी यांना माझाचा सलाम