ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला, 30 जूनपर्यंत कोअर भागात सफारीसाठी परवानगी
सारंग पांडे, एबीपी माझा | 26 Jun 2021 12:55 AM (IST)
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प उद्यापासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. ताडोबा प्रशासनाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर 15 एप्रिल 2021 पासून प्रादुर्भाव टाळण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प बंद करण्यात आला होता. 4 जून च्या राज्य शासनाच्या आदेशानुसार पर्यटन संबंधीत गतिविधी राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे 30 जून पर्यंत कोअर भागात सफारी सुरू करण्यास परवानगी दिली आहे.