Amravati : लावणी सम्राज्ञी नव्हे हा आहे लावणी सम्राट,लावणीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या स्वप्नीलची कहाणी
प्रणय निर्बाण, एबीपी माझा | 02 Aug 2021 08:43 PM (IST)
अमरावती जिल्ह्यातील बेलोरा या अत्यंत ग्रामीण भागातला स्वप्नील हा मुलगा असून तो अतिशय उत्कृष्ट लावणी करतो. लावणी साठी लागणारे हावभाव, अदाकारी, नजाकत या सर्व गोष्टीमुळे लावणीच्या माध्यमातून प्रेक्षकांना घायाळ स्वप्नील करत असतो. स्वप्नीलवर प्रेक्षक ही खूप खुश असतात. महाराष्ट्राची लावणीला त्याने आज दिल्ली पर्यंत नेऊन पोहचवले आहे. संपूर्ण भारतातून स्वप्नील हा पहिला पुरुष लावणी कलाकार आहे की त्याला लावणीसाठी दिल्ली येथून भारत गौरव पुरस्कार सन्मानित झालेला आहे. लावणी साठी स्वप्नीलला घरातून आणि गावातून खूप जास्त विरोध होता पण त्याने लावणी करणे सोडलं नाही.