Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Nagpur Leopard: डार्ट लागून गुंगीचं औषध शरीरात भिनलं, तरीही बिबट्याची 15 फूट उंच उडी, अखेर गच्चीतून खाली पडला, नागपूरमध्ये बिबट्याला पकडण्याचा थरार
नागपूरच्या शिवनगर परिसरात दाट लोकवस्तीमध्ये बिबट शिरल्यामुळे मोठी खळबळ माजली. या बिबट्याला एक तासाच्या रेस्क्यू ऑपरेशनंतर पकडण्यात आले आहे.
सकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान बिबट्याने या परिसरातील चार जणांना जखमी केले होते. त्यानंतर पोलिसांनी बिबट लपून बसलेल्या घराच्या अवतीभवती कडक पहारा ठेवला होता.
वनविभागाने याठिकाणी आल्यानंतर या बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंदुकीतून बिबट्याच्या शरीरावर दोन डार्ट मारले.
हे डार्ट लागल्यानंतर गुंगीचे औषध बिबट्याच्या शरीरात भिनायला लागले.
मात्र, त्याअवस्थेतही बिबट्याने 15 फूट उंच उडी मारली आणि दुसऱ्या गच्चीत जाण्याचा प्रयत्न केला.