Sudhir Mungantiwar Special Report : 'पराभव झाल्यास खचणार नाही', का म्हणाले सुधीर मुुनगंटीवार?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSudhir Mungantiwar Special Report : 'पराभव झाल्यास खचणार नाही', का म्हणाले सुधीर मुुनगंटीवार?
सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते... प्रभावी, स्पष्ट आणि मुद्देसूद बोलणारे नेते... आता मात्र वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलेत... विजय झाला तर उतणार नाही आणि मातणार नाही... आणि पराभव झाला तर खचणार नाही... असं वक्तव्य त्यांनी केलंय... खरंतर, लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा नव्हती... आणि आता निकाल काही तासांवर त्यांनी असं वक्तव्य केलंय... पाहूयात मुनगंटीवार यांच्या वाक्यांचा अर्थ आणि अन्वयार्थ काय..
जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रिक मारताना दिसताहेत.
मग महाराष्ट्राचे वनमंत्री, सांस्कृतिक मंत्री...
आणि भाजपचे चंद्रपूरचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार
स्वतःच्या कामगिरीचं विश्लेषण करताना पराभवाबदद्ल का बोलताहेत..?
खरं तर या प्रश्नाचं उत्तर कदाचित लोकसभा निवडणुका होण्यापूर्वीच राजकीय पंडितांना मिळालं असावं..