Special Report Raj & Uddhav Thackeray | राज-उद्धव खरंच एकत्र येणार? राज ठाकरे कोणती भूमिका घेणार?
Special Report Raj & Uddhav Thackeray | राज-उद्धव खरंच एकत्र येणार? राज ठाकरे कोणती भूमिका घेणार?
राज आणि उद्धव हे दोघेही ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा सध्या अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न. आधी राज ठाकरेंनी टाळी देण्याची भाषा केली. मग उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि राज्यात शिवसेना-मनसे युतीच्या चर्चा रंगल्या. मात्र यावर मनसेचे नेते तीव्र प्रतिक्रिया देताना दिसतायत. पण राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना तूर्तास मौन बाळगण्याच्या सूचना दिल्यायत. पण याचं नेमकं कारण काय? राज आणि उद्धव खरंच एकत्र येणार? मनसैनिकांना गप्प करुन राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार? पाहूयात राजकीय शोलेमध्ये हा खास रिपोर्ट ..
दोन दिवसांपासून महाराष्ट्राला पडलेले हे प्रश्न खरं तर या प्रश्नांची थेट आणि खरी उत्तरं देणारी नाव दोनच... एक उद्धव ठाकरे आणि दुसरं म्हणजे राज ठाकरे... ठाकरे बंधूंनी वक्तव्याच्या रूपात टीजर सोडला आणि पिक्चर रीलिज व्हायच्या आधीच ज्यानं त्यानं रिव्ह्यूव्ह द्यायला सुरूवात केली.मनसेत राज ठाकरेंचाच शब्द अंतिम असतो ही आजवरची परंपरा.. ही परंपरा अबाधित राहावी म्हणून परदेशात फिरायला गेलेल्या राज ठाकरेंनी मनसे नेत्यांसाठी फर्मान सोडलं..