Special Report on Sleeper Vande Bharat : पश्चिम रेल्वेवर धावणार स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस
जयदीप मेढे | 16 Jan 2025 12:16 AM (IST)
Special Report on Sleeper Vande Bharat : पश्चिम रेल्वेवर धावणार स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस
अलीकडेच अमृत भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. भारतीय रेल्वेत अनेक सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. भारतीय रेल्वेचा संक्रमणाचा आणि कात टाकण्याचा काळ आहे. भारतीय रेल्वे प्रचंड कामगिरीच्या जोरावर अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावत आहे. सन २०२५ उजाडले आहे.या आगामी वर्षात भारतीय रेल्वेचे काही महत्त्वाचे प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकतात. यापैकी एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन. वंदे भारत रेल्वेनंतर आता वंदे भारत स्लीपर कोच रेल्वे कशी असेल, याची उत्सुकता देशवासीयांमध्ये आहे. ही वंदे भारत स्लीपर नेमकी दिसते तरी कशी चला तर पाहूया हा स्पेशल रिपोर्ट....