Special Report | कांद्याच्या दरांमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Feb 2021 08:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली बघायला मिळत असून नाशिकमध्ये किरकोळ बाजारात कांदा 50 ते 60 रुपये किलोने विकला जातोय. आधीच अवकाळी पावसाचा फटका त्यातच आता लाल कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने कांद्याची आवक कमी झाली आहे आणि त्यामुळेच दरात वाढ झाल्याचं बघायला मिळतय, पुढील काही दिवस तेजी कायम राहील असा अंदाज वर्तवला जातोय. एकीकडे किरकोळ बाजारात जरी कांद्याची भाववाढ झाल्याचं दिसून येत असलं तरी दुसरीकडे शेतकऱ्यांना हवा तसा भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करतोय.