Special Report On Narendra Modi : मोदी नागपुरात संघ दक्ष; नागपुरातील संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणारे मोदी दुसरे पंतप्रधान
Special Report On Narendra Modi : मोदी नागपुरात संघ दक्ष; नागपुरातील संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणारे मोदी दुसरे पंतप्रधान
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपुरात माधव नेत्रालयाच्या पाया भरणीसाठी येत आहेत. यासोबतच ते संघ कार्यालयात जाऊन संस्थापक बळीराम हेडगेवरांच्या स्मृतीलाही अभिवादन करणार आहेत. पंतप्रधान झाल्यापासून मोदींची संघ कार्यालयाला ही पहिलीच भेट असल्याने त्यांना त्यांचा हा नागपूर दौरा चांगला चर्चित आला. 15 मिनिटांची भेट आहे पण त्यात नावीन्य देखील आहे. पाहूया एक रिपोर्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाच्या आठव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले आणि भाजपात जाण्यापूर्वी संघाच्या प्रचारक पदापर्यंत पोहोचले. राष्ट्र सर्वोपरी मानणाऱ्या संघाला मोदी आईसारखं मानतात. पण भाजपा मध्ये गेल्यापासून म्हणजे जवळपास 30 वर्षात मोदी संघ मुख्यालयात कधी गेले नाहीत. हा योगायोग. रविवार येतोय, संघ स्वयंसेवक असलेल्या अटल बिहारी वाजपेयीं नंतरचे ते दुसरे पंतप्रधान संघ मुख्यालयाला भेट देत आहेत. राम मंदिर निर्माण, कलम 370 हटवणं आणि तीन तलाक रद्द करण्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच स्वप्न मोदींनी मोठ्या खोबीन कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण केलाय. त्यामुळे मोदींच्या या भेटीला आगळं वेगळं महत्व आहे. नरेंद्र मोदी यापूर्वीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची. विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिले आहे. देशभरातील संघाच्या विविध कार्यालयांमध्ये एक प्रचारक म्हणून त्यांची उपस्थिती पण राहिलेली आहे. नागपुरातील रेशिमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसर असो किंवा महाल परिसरातील संघ मुख्यालय असो अनेक जुन्या स्वयंसेवकांनी नरेंद्र मोदी यांना एक सामान्य स्वयंसेवक म्हणून तिथे वावरताना पाहिलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा संघाशी नातं खूप जुनं आहे. मात्र आता 30 मार्च रोजी जेव्हा नरेंद्र मोदी संघ स्थानी पोहोचत आहेत तेव्हा अनेकांच्या मनात प्रश्न. की त्या ठिकाणी येणारे स्वयंसेवक आणि प्रचारक असलेले नरेंद्र मोदी आहेत की त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. स्वयंसेवक, पूर्व प्रचारक आणि आता जे देशाचे पंतप्रधान आहेत ते माननीय नरेंद्र मोदीजी स्मृती भवनात येत आहेत. आधीच्या सहजपणे त्यांच येणं झालेला आहे. स्वयंसेवक म्हणून प्रचारक म्हणून तस येणं कदाचित झालं नसेल पण नात. आहे त्यांच त्या भूमीशी, ते त्यांच्या मनामध्ये सदैव विद्यमान आहे, राहील, पंतप्रधान म्हणून सुद्धा ते समाधीच्या दर्शनाला येतायत, स्वाभाविकपणे सगळ्यांसाठी तो एक आनंदाचा पण विषय आहे. पंतप्रधान मोदी आत्ताच संघ कार्यालयात का येतायत हा प्रश्न अनेकांना पडला. पंतप्रधान पदाच्या दहा वर्षात ते नागपूरला कित्येकदा आले, विदर्भातही अनेकदा आले, पण संघ मुख्यालयात ते कधी गेले नाहीत. राजकीय विश्लेषकांच्या मते याच उत्तर लोकसभा निवडणुकीत आणि संघाच्या मूळ जडणघडणीत दडल. संघविषयक मुद्द्याचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी संघ आणि भाजपात समन्वय वाढावा यासाठी ही भेट असावी असं म्हटल. लोकसभा निवडणुकीमध्ये संघ परिवार आणि भाजप मध्ये संघर्षाची स्थिती होती. लोकसभा निवडणुकीत तो संघर्ष रिफ्लेक्ट झाला. 400 ची जागा 240 वर आली. नंतर काय घडलं? संघर्ष वरन समन्वय सुरू झाला आणि समन्वय झाल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये, दिल्लीमध्ये, हरियाणामध्ये आपण बघितलं की लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा भिन्न रिझल्ट लागला. अपकी बार 400 पार असा नारा देऊनही भाजपला लोकसभा निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही किंबहुना जोरदार फटकाही बसला. तेव्हा जेपी नड्डा यांचा कथित वक्तव्य. आणि त्यामुळे स्वयंसेवकांची नाराजी एक कारण मानलं गेलं. त्यानंतर मात्र तीन राज्यात निवडणुका झाल्या आणि भाजपला अपेक्षापेक्षा मोठा यश मिळालं आणि तेव्हा विश्लेषण केलं गेलं की संघाच्या स्वयंसेवकांनी पडद्यामागून सक्रिय भूमिका बजावली आणि त्यामुळे भाजपच्या पदरात मोठं यश आलं. आता जेव्हा मोदी संघ स्थानी येत आहेत तेव्हा अनेक लोक असही मानतायत की भाजपला भविष्यासाठी संघाची गरज आहे आणि त्यामुळेच मोदी. संघस्थानी येत आहेत. भाजपला संघाची गरज प्रकर्षाने वाटते आहे का? आणि त्यामुळेच मोदी संघ मुख्यालयात येतायत का? हे समजून घेण्यासाठी भाजपची निर्मिती का आणि कशी झाली ते पाहाव लागेल. कारण भारतीय जनता पार्टी हाच एकमेव पक्ष असा आहे की जो संघाचे सदस्य आहे या या कारणाववरून निर्माण झाला. ज्यावेळेला जनता पार्टी होती सुरुवातीच्या काळात त्यावेळेला मधुलिम यांनी हा प्रश्न विचारला होता. की तुम्ही दुहेरी सदस्यत्व चालणार नाही. तुम्ही एकतर जनता पार्टीचे सदस्य राहा किंवा संघाचे स्वयंसेवक रहा. आणि त्यावेळेला सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की नाही आम्ही दोन्ही राहू. आम्ही संघाचे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असताना मोदींची ही भेट'. महत्त्वाची वाटते. संघ भाजपाच्या पितृस्थानी आहे हे भाजप नेते नाकारत नाहीत आणि मोदी हे संघाचे सर्वात यशस्वी स्वयंसेवक आहे हे संघही नाकारणार नाही. ही पिता-पुत्राची भेट होताना पित्याकडून नियंत्रण वाढेल की अधिक मोकळीक दिली जाईल हे नजीकच्या काळात दिसून येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरामध्ये फक्त 15 मिनिट थांबणार आहे. मात्र हेच 15 मिनिट देशाच्या राजकारण आणि समाजकारणावर दीर्घ काळापर्यंत परिणाम टाकतील हे निश्चित कॅमरामॅन वेंकेश नायडू आणि अतुल हिरडे सह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.