Special Report : पंजशीरचा नवा लायन.. अहमद मसूद! Afghanistan च्या 'पंजशीर'ला इतकं महत्त्व का आलं?
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2021 11:48 PM (IST)

अफगाणिस्तान : अवघ्या एका वर्षात अमेरिकेनं अफगाणिस्तानात सैन्य तैनात करुन तालिबान आणि अल कायदाला हुसकावून लावलं. अफगाणिस्तानमध्ये लोकशाही प्रस्थापित झाली. 2011 साली अमेरिकेने लादेनचा खात्मा केला. 2013 मध्ये तालिबानच्या मुल्ला उमरचाही मृत्यू झाला. वाटलं अफगाणिस्तानात आता शांतता नांदेल पण झालं उलटंच. आता तर अफगाणिस्तानला वाचवण्यासाठी अहमद शाह मसूदही नाहीत. पण त्यांचीच छाप असलेला त्यांचा मुलगा, पंजशीरचा नवा लायन बनला आहे.