Special Report MVA :कर्नाटकातील विजयानंतर मविआला नवं बळ, मविआला धार, वज्रमुठीचा निर्धार : ABP Majha
abp majha web team | 15 May 2023 11:20 PM (IST)
कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्रातील महाविकास आघाडी वर सुद्धा होताना पहायला मिळतात. कर्नाटकचा निकाल हाती आल्यानंतर लगेचच तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची सिल्वर ओकवर बैठक पार पडली..यावेळी मविआ अधिक भक्कम करण्यासाठी स्ट्रॅटेजी आखण्यात आल्याचं पहायला मिळतंय. आगामी निवडणुकांच्या जागा वाटपावरुन वाद टाळण्यासाठी तीनही पक्षांच्या सदस्यांची एक कमिटी गठीत केली जाणारे...पाहूया आगामी निवडणुकीसाठी मविआच्या मोर्चेबांधणीवरचा हा स्पेशल रिपोर्ट...