Special Report Marathwada Temple Land : मंदिराच्या इनामी जमिनींबाबत निर्णय काय? राज्य सरकारचा प्रस्तावित निर्णय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Marathwada Temple Land : मंदिराच्या इनामी जमिनींबाबत निर्णय काय? राज्य सरकारचा प्रस्तावित निर्णय
हे देखील वाचा
अजित पवारांची डोकेदुखी वाढली; 19 मतदारसंघात बंडखोरीची शक्यता, दिग्गजांच्याही मतदारसंघात फूट?
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit pawar) कंबर कसली असून त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. महायुतीमध्ये जागावाटपापासून उमेदवार निवडून आणेपर्यंत त्यांना आता रणनीती आखायची आहे. मात्र, तत्पूर्वी जागावाटपात अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवारांची कसरत होणार आहे. कारण, लोकसभेला (Loksabha) 48 पैकी केवळ 4 मतदारसंघात त्यांनी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी, रायगड लोकसभा मतदारसंघातच त्यांना विजय मिळाला. त्यामुळे, आगामी विधानसभा (vidhansabha) निवडणुकांत त्यांना ताकद दाखवावी लागणार आहे. मात्र, महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सामोरे जाण्याचं आव्हान अजित पवारांसमोर आहेत. त्यातच, महायुतीतील (Mahayuti) जागावाटपानंतर तब्बल 19 मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे, अजित पवारांनी डोकेदु:खी वाढणार आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 19 विद्यमान आमदारांच्या विधानसभा मतदार संघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामध्ये, सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या, काही मंत्र्यांच्या मतदारसंघातही बंडखोरीची शक्यता आहे. कारण, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार नरहरी झिरवळ, आमदार सुनिल शेळकर, सुनिल टिंगरे यांच्या मतदारसंघात बंडखोरीची शक्यता आहे. यांसह राज्यातील विधानसभेच्या एकूण 19 मतदारसंघात महायुतीतील जागावाटपावरुन खटका उडू शकतो. या 19 मतदारसंघात बंडखोरीचा सामना होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, अजित पवार आपल्या आमदारांना तिकीट देण्यात किंवा त्यांची नाराजी दूर करण्यात किती सरस ठरतात हे पुढील काही दिवसांतच दिसून येईल.