Marathwada Coach Factory |मराठवाडा रेल कोच कारखान्यात 'माझा',मराठवाड्याच्या विकासातील महत्वाचा टप्पा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलातूर : प्रकल्पाची घोषणा होऊनही त्या प्रकल्पातून उत्पादन बहुतांशवेळा निर्धारित वेळेत पूर्ण होत नाही. अनेकदा तर प्रकल्पाची घोषणा होते आणि ते प्रकल्प रेंगाळतात. मात्र मराठवाड्यातील लातूर शहरातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये पहिली रेल्वे कोच शेल तयार झाली आहे. तीही अगदी वेळेत. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी हा ऐतिहासिक क्षण त्यांच्या ट्विटरवरून ट्विट केला आहे. सुशासन दिवस अर्थात स्व . अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर ही पहिली कोच शेल पूर्णत्वाने साकारण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. या प्रकल्पामुळे 5 हजार जणांना थेट आणि 10 हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. विशेष म्हणजे कोरोना साथीच्या काळातही रेल्वे विभागाने वेगात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.