PM Narendra Modi On BJP Mumbai Win : मुंबईत भाजपला रेकॉर्डब्रेक जनमत, नरेंद्र मोदींकडून कौतुक

Continues below advertisement

 राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई (Mumbai) महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही.  यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे कौतुक केले आहेत.
भाजप-शिवसेना महायुतीने मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठल असून भाजपने 89 तर तर शिंदेंच्या शिवसेनेनं 29 जागा जिंकल्या आहेत. मात्र, निकालानंतर शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shivena) मुंबईतील नगरसेवकांना संपर्क साधला जात असल्याची चर्चा आहे.  आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी, अडीच वर्षे महापौरपद शिवसेनेला घेण्यासाठी हे सुरू असल्याचंही बोललं जातंय. आता, या चर्चेवर भाजप (BJP) नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका मांडली. 

ठाकरेंच्या संपर्कामुळं शिंदेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मुंबईतील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत. ठाकरेंच्या हालचालींमुळं शिंदेंना धोका किंवा संधी मिळेल, अशा चर्चा सुरु आहेत. बार्गेनिंग पॉवर वाढल्यानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपकडे महापौर पदाची मागणी करण्यात आल्याच्या चर्चाही होत आहेत. स्थायी समितीसह इतर समित्यांसाठी देखील शिवसेना आग्रही  राहू शकते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढल्याचं दिसून येत आहे. तर, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षामुळे मुंबईत शिवसेनेचा महापौर असावा, अशी एकनाथ शिंदेंची इच्छा आहे. त्यामुळे, अडीच वर्षे महापौरपद एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मागण्यात येत असल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चेवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.  

आमचे पार्लमेंटरी बोर्ड आहे, तिथे जी काही मागणी आहे ती येईल, माझ्याकडे तरी काही मागणी आलेली नाही. आमच्या पार्टमेंटरी बोर्डच्या बैठकीत एकनाथ शिंदे हेही आहेत. आमच्या समन्वय समितीमध्ये देवेंद्रजी, अजित दादा आणि एकनाथ शिंदे हे एकत्रित बसून निर्णय घेतील. जर मागणी असेल तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. यासंदर्भात जी चर्चा करायची आहे, ती माध्यमांत थोडीच होत असते, पत्रकारांशी होत नसते, ती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच होईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola