Special Report : चिनी कुरापतींचा 'पूल', चीन बांधतोय Pangong Tso Lake वर 400 मीटरचा पूल
abp majha web team | 20 Jan 2022 11:26 PM (IST)
भारत आणि चीनमध्ये अनेक दिवसांपासून सीमाभागात तणावाचे वातावरण आहे. चीन पँगाँग सरोवरावर पूल बांधत आहे. ज्याची लांबी आता 400 मीटरपेक्षा जास्त झाली आहे. पूल पूर्ण झाल्यावर चीनचे या प्रदेशात लष्करी बळ वाढणार आहे. चीन या पूलाचं बांधकाम युद्धपातळीवर करत असल्याचं उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रातून स्पष्ट होत आहे. हा पूल तयार झाल्यानंतर नॉर्थ बँकेच्या सैनिकांना रुटोग येथे त्यांच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी पँगाँग सरोवराभोवती सुमारे 200 किलोमीटरचा वळसा घालण्याची गरज भासणार नाही. हा प्रवास आता सुमारे 150 किमीने कमी होणार आहे.