Special Report Bangladesh : शेख हसीना यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, बांगलादेश का पेटलं?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Bangladesh : शेख हसीना यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, बांगलादेश का पेटलं?
हे देखील वाचा
Hasina Shaikh Resign : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा ABP Majha
बांगलादेशच्या (Bangladesh Violance) पंतप्रधान शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रचंड हिंसाचार सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी राजीनामा देऊन, त्या सुरक्षित पण अज्ञात स्थळी रवाना झाल्या. शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीनं देश सोडला असून त्या दोघीही सुरक्षित स्थळी निघून गेल्या आहेत.
बांगलादेशात सध्या अस्थिर वातावरण आहे. यामुळेच त्यांनी बांगलादेश सोडून सुरक्षित स्थळी गेल्याची माहिती मिळत आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे बांगलादेशात मोठा हिंसाचार सुरू आहे. पंतप्रधान शेख हसीना भारताच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशची सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.