Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report
२३ नोव्हेंबरला टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छलचा लग्नसोहळा सांगलीमध्ये आयोजित करण्यात आला होता. पण नेमकं लग्नादिवशीच एक विघ्न आलं आणि लग्न लांबणीवर पडलं.... त्यानंतर सुरु झाल्या उलटसुलट चर्चा.... आता हे लग्न होणार की नाही असा याच्याही चर्चा सुरु झाल्या. पण तब्बल दोन आठवड्यांनी स्मृतीनं या सगळ्याविषयीचं मौन सोडलं आणि थेट लग्न मोडल्याचं जाहीर केलं... पाहूयात या सगळ्या प्रकरणासंदर्भातला हा खास रिपोर्ट....
२ नोव्हेंबरला टीम इंडियाच्या वुमन्स ब्रिगेडनं विश्वचषक जिंकला...
या ऐतिहासिक विजयाची देशभरात जितकी चर्चा झाली
तितकीच चर्चा रंगली ती मैदानातल्या या खास सेलिब्रेशनची...
ते सेलिब्रेशन होतं... टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना
आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं.....
((व्हिडीओ.... वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचं पलाश-स्मृतीचं सेलिब्रेशन))
स्मृती आणि पलाश रिलेशनशीपमध्ये आहेत
हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून आधीच जगजाहीर झालं होतं
मात्र विश्वचषक जिंकल्यानंतर पलाशनं मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवरच
स्मृतीला लग्नासाठी प्रपोज केलं... हा व्हिडीओही तुफान व्हायरल झाला
((व्हिडीओ... प्रपोज करतानाचा))
स्मृतीनंही आपल्या सहकाऱ्यांसह एक व्हिडीओ केला
आणि सोशल मीडियातूनच लग्नाला होकारही देऊन टाकला....
((समझो होही गया... या गाण्यावरचा व्हिडीओ))
लग्नाची तारीखही ठरली...
२३ नोव्हेंबर २०२५...
स्मृतीच्याच घरी म्हणजे सांगलीमध्ये
लग्नसोहळ्याची लगबग सुरु झाली....
पाहुणे मंडळींचं आगमन झालं...
पलाशचं कुटुंब, मित्रमंडळी सांगलीत पोहोचली...
संगीत सेरेमनी झाली... हळद लागली....
((व्हिडीओ.... लग्नाआधीच्या कार्यक्रमांचे....))
आणि लग्नाचा दिवस उजाडला....
सकाळपर्यंत तरी सगळं काही ठीक वाटत होतं...
मात्र दुपारी एक वाजल्यानंतर लग्नघरातून एक मोठी बातमी आली....
स्मृतीचे वडील अचान आजारी पडल्याची...
त्यांना तातडीन रुग्णालयात दाखल करावं लागलं...
आणि वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं...
((व्हिज्युअल्स... अँब्युलन्स... घराबाहेरचे व्हीज))
मग वडिलांच्या तब्येतीचं कारण देत लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं....
बाईट - इव्हेंट मॅनेजरचा...
((अगदी एका वाक्यात... वडिलांची तब्येत बिघडल्यानं लग्न लांबणीवर))
इथपर्यंत ठीक होतं....
पण या घटनेच्या दुसऱ्या दिवशी...
स्मृतीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन
लग्नासंबंधीच्या सगळ्या पोस्ट हटवल्या...
आणि एकच खळबळ उडाली....
आणि प्रश्न उपस्थित झाला.. स्मृती आणि पलाशमध्ये नक्की काही बिनसलं का?
((व्हिज्युअल मोंटाज.... पलाश-स्मृती... स्मृती वडिलांना भेटायला रुग्णालयात जाताना....))
सोशल मीडियात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या...
आणि त्यात पलाश आणि त्याच्या एका मैत्रिणीच्या
कथित चॅटचे स्क्रीनशॉट्स लीक झाले....
((फोटो....))
या सगळ्या चर्चा...
सोशल मीडियातून उठणाऱ्या अफवा...
या सगळ्यावर स्मृतीनं तब्बल दोन आठवड्यांनी मौन सोडलं
आणि अखेर सोशल मीडियातून हे लग्न मोडल्याचं जाहीर केलं....
((ग्राफिक्स इन...))
'लग्न मोडलं, पण....'
-----------------------------
"गेल्या काही दिवसांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरंच बोललं जात आहे... म्हणून मला वाटलं की आता बोलायला हवं... मला काही गोष्टी खाजगीतच ठेवायला बोलण्याची वेळ आली आहे. मी काही गोष्टी खाजगीतच ठेवण्याला प्राधान्य देते पण मला आता हे स्पष्ट करायचंय की आमचं लग्न रद्द झालंय.
मला हे प्रकरण इथंच थांबवायचंय. मी तुम्हाला विनंती करते की हे प्रकरण आणखी वाढवू नका. मला देशासाठी शक्य तितकं खेळायचंय. सामने जिंकायचे आहेत आणि संघासाठी ट्रॉफी घरी आणायची आहे. तेच माझे ध्येय आहे आणि ते पुढेही राहील.."
((ग्राफिक्स आऊट...))
स्मृतीनं आपल्या भावना थेट व्यक्त केल्या...
आणि या प्रकरणाला पूर्णविराम दिला....
स्मृतीपाठोपाठ पलाशनंही पोस्ट करत याला दुजोरा दिला...
दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं....
((व्हिडीओ .... मैदानातील सेलिब्रेशन, प्रपोजचा व्हिडीओ.. लग्नाच्या आधीचे व्हिडीओ... हळद.... पोस्ट... दोघांचे लग्नानंतरचे व्हिज... पलाशचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ...))
२ नोव्हेबर ते सात डिसेंबर....
अवघ्या महिनाभरात घडलेल्या या सगळ्या घडामोडींनी
क्रिकेट आणि बॉलिवूडविश्वातील दोघांच्या चाहत्यांना एकच धक्का दिला....
पण लग्न नेमकं का मोडलं...? याचं उत्तर मात्र अजून अनुत्तरीतच आहे....
सिद्धेश कानसेसह ब्युरो रिपोर्ट... एबीपी माझा