UPA President : सामनातून 'यूपीए'वर बाण; यूपीएच्या अध्यक्षपदावरुन 'सामना' रंगणार Special Report
abp majha web team
Updated at:
31 Mar 2022 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद द्यावं, असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मंजूर केल्यानंतर शिवसेनेनंही यूपीएच्या जीर्णोद्धाराची गरज व्यक्त केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून आज यावर भाष्य करण्यात आलं आहे. यूपीएचा सातबारा सध्या काँग्रेसच्या नावावर आहे पण त्यात बदल केल्याशिवाय विरोधकांची भक्कम एकजूट होणं शक्य दिसत नाही, असं स्पष्ट मत सामनातून व्यक्त करण्यात आलं आहे.