Shiv Jayanti 2025 : शोभायात्रा, ढोल पथकं, पोवाडे; राज्यभरात शिवजयंतीचा जल्लोष Special Report

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९५ वी जयंती...यानिमित्त राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नेतेमंडळींसह सर्व शिवप्रेमींनी आपल्या लाडक्या राजाची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली. शोभायात्रा, ढोल पथकं, पोवाडे, साहसी खेळांच्या माध्यमातून शिवरायांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. बघुयात...
छत्रपती शिवरायांची ३९५वी जयंती
राज्यभरात विविध ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा
रयतेच्या राजाला मानाचा मुजरा..
ढोल-ताशाच्या गजरात शोभायात्रांचं आयोजन
शिवनेरी, रायगडावर शिवजयंती साजरी
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसृष्टीचं उद्घाटन
राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची पायाभरणी
रायगडावरील सोहळ्याला विकी कौशलची हजेरी
शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली..
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेतेमंडळी यावेळी उपस्थित होते..
शिवनेरी किल्ल्यावर आज फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती...
पोलीस पथकानं शिवरायांना मानवंदना दिली..
ढोल-ताशाच्या वादनासह साहसी खेळांचं सादरीकरणही करण्यात आलं.