Shinde Fadnavis Advertisement : शिनसेनेच्या जाहिरातीवरुन आरोप-प्रत्यारोप Special Report
abp majha web team | 14 Jun 2023 11:32 PM (IST)
काल आणि आज महाराष्ट्रात चर्चाय ती, दोन जाहिरातींची... कालच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा फोटो नाही आणि फडणवीसांना शिंदेंपेक्षा कमी पसंती असल्याचा उल्लेख... त्यावरून आरोपांचा धुरळा उडला... तो खाली बसला नाही तोच, आज पुन्हा नवी जाहिरात... त्यात मात्र बाळासाहेब, आनंद दिघे, मोदी, अमित शहा आणि महत्त्वाचं म्हणजे, देवेंद्र फडणवीसांचा फोटोही आहे... आणि त्यातला मजकूर मात्र एकीचा सूर दर्शवतो... ही तर झाली बातमी... मात्र या बातमीमागे नेमकं काय घडलंय, कालच्या जाहिरातीनंतर शिंदेंचे कान कुणी टोचले तर नाहीत ना? की शिंदेंनी भाजपवर दबाव टाकण्यासाठी हे जाहिरातींची शक्कल लढवली... प्रश्न अनेक आहेत... पाहूयात, त्याबाबतचा स्पेशल रिपोर्ट...