Sharad Pawar on Election 2026 : पुण्यात पुतण्यासोबत, मुंबईत 'ठाकरे'बंधूंसोबत?
मुंबईत सर्वप्रथम युतीची अधिकृत घोषणा केली ती ठाकरे बंधूंनी. मात्र ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढवायची की स्वबळावर याचा निर्णय घेताना अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तळ्यात-मळ्यात सुरु असल्याचं चित्र आहे. ठाकरे बंधूंकडून ज्या जागा पवारांसाठी सोडण्यात येणार आहेत, त्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर झालेत. ठाकरेंनीही या जागांवर उमेदवार दिलेले नाहीत. मात्र मंगळवारी हेच चित्र राहिल, याची खात्री देता येत नाहीय. नेमकं काय घडतंय मुंबईत... आढावा घेऊया, राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमधून.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचं हे वक्तव्य आहे शुक्रवारचं.
त्यानंतर विकेंड संपून सोमवार सरला तरी परिस्थिती जैसे थे आहे.
मुंबईत युती जाहीर करण्यात पहिला नंबर पटकावला तो ठाकरे बंधूंनी.
मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आला तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मात्र काहीच ठरत नाहीय.
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत जाण्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
मात्र त्याचवेळी या युतीच्या आशादेखील संपलेल्या नाहीत.
राष्ट्रवादीनं ठाकरे बंधूंकडे मुंबईत ५२ जागा देण्याची मागणी केली.
मात्र ठाकरे बंधूंकडून १० ते १२ जागा सोडण्याची तयारी
राष्ट्रवादीकडून मुंबईत ७ जणांची यादी जाहीर केलीय.
या ७ जागांवर ठाकरेंनी अद्याप उमेदवार दिलेले नाहीत.
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी अद्याप पवारांच्या राष्ट्रवादीचं चित्र धूसरच आहे.
राष्ट्रवादीनं जाहीर केलेल्या ७ जागांवर ठाकरे बंधूंनी उमेदवार दिले नसले तरी शेवटच्या दिवशी हे चित्र बदलण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा अनुभव पाहता शिवसेनेनं मनाची तयारी करून ठेवल्याचं दिसतंय.
एरवी शरद पवारांची जोरदार पाठराखण करणाऱ्या संजय राऊतांच्या भाषेत अशी राजकीय सावधगिरी दिसतेय, ती त्यामुळेच.