Sharad Pawar MVA Special Report:कार्यक्रमात दोस्ती, MVAत कुस्ती, पवारांच्या उपस्थितीने विरोधक नाराज?
abp majha web team | 01 Aug 2023 10:45 PM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय, हेच कळायला मार्ग नाहीय... एक पक्ष... दोन प्रमुख... एक सत्तेत आणि दुसरे विरोधात... त्यात पुन्हा भाजपविरोधात विरोधकांची मोट... मात्र असं असताना, विरोधकांमधलं मोठं नाव म्हणजे शरद पवार... तेच मोदींच्या मांडीला मांडी लावून कार्यक्रमात बसले, म्हटल्यावर, महाविकास आघाडीच चुळबूळ तर वाढणारच... आताही नेमकं असंच झालं... आजच्या मोदींच्या कार्यक्रमानंतर... पाहूयात, मोदींसोबत पवारांच्या उपस्थितीनं महाविकास आघाडीत भांड्याला भांडं कसं लागतंय..