Sharad Pawar Saved MVA Special Report : मविआसाठी पवारच ठरले संकटमोचक, बैठकीत पवारांनी खडसावलं
abp majha web team | 28 Mar 2023 11:44 PM (IST)
सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना जळजळीत शब्दांमध्ये सुनावलं. त्यामुळे तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या पंगतीत मिठाचा खडा पडतो की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.. मात्र, महाविकास आघाडीचे कॅप्टन असलेल्या शरद पवार यांनी पुढाकार घेतला. आणि सावरकरांच्या झंझावातात हेलकावणारं महाविकास आघाडीचं जहाज बुडता बुडता वाचवलंय..मात्र भाजपने-शिवसेनेनं ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्धार केलाय.. त्यामुळे हा सावरकरांवरील वक्तव्याचा वाद शमतोय की वाढतोय पाहावं लागेल