अधुरी एक कहाणी...सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज गिल खचली, Siddharth आणि Shehnaz च्या मैत्रीचा प्रवास
एबीपी माझा वेब टीम | 03 Sep 2021 11:59 PM (IST)
Shehnaaz Gill on Sidharth Shukla Death: अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)चं काल हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. सिद्धार्थच्या मृत्यूनं संपूर्ण बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्याचा परिवारासह चाहत्यांना अजूनही यावर विश्वास बसत नाही. यात सिद्धार्थ शुक्लाची जवळची मैत्रिण शहनाज कौर गिल (Shehnaaz Gill)ची प्रतिक्रिया काय असेल याकडं सर्वांचं लक्ष लागून होतं. शहनाजला सिद्धार्थच्या मृत्यूनं मोठा धक्का बसला आहे. शहनाजच्या वडिलांनी याबाबत माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार शहनाजनं आपल्या वडिलांना सांगितलं की, 'माझ्या हातात त्यानं जीव सोडला, मी आता कसं जगू.'