Semiconductor Chip Shortage :सेमीकंडक्टर चिपमुळे चारचाकी गाड्यांना ब्रेक;देशात 7 लाख गाड्या वेटिंगवर
abp majha web team
Updated at:
16 Dec 2021 10:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचारचाकी वाहनांमधल्या सेमी कंडक्टर चिपच्या तुटवड्यामुळं देशातील सात लाखांहून अधिक ग्राहकांना आपली कार घरी घेऊन जाता येत नाहीय. ही सारी ग्राहक मंडळी गेले सहा महिने प्रतीक्षा यादीत आहेत. उशिरात उशिरा किमान दसरा-दिवाळीला तरी कार ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण २०२१ हे वर्ष संपत आलं तरीही या ग्राहकांचं कार घरी घेऊन जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलेलं नाही किंवा ते स्वप्न कधी पूर्ण होईल, हेही सांगता येत नाही. पाहूयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.