पंढरपूरमध्ये भरतेय बिन भिंतींची शाळा, रॉबिनहूड आर्मीचा अनोखा प्रयोग, मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Dec 2020 09:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या संकटामुळे देशभरातील शाळा गेल्या आठ महिन्यापासून बंद होत्या पण या शाळातून मोबाईलद्वारे ऑनलाईन शिक्षण व्यवस्था लाखो मुलांना देण्यात येत होती. मात्र ज्यांना रोज खायची भ्रांत अशा गोरगरीब मुलांना कुठली आलीय शाळा आणि कुठले आलाय ऑनलाईन शिक्षण, पण कोरोनाकाळात गोरगरिबांच्या पोताचो सोया करणाऱ्या रॉबिन हूड आर्मीने अशा गरीब आणि गरजू मुलांनी मोलमजुरीकडे व गुन्हेगारीकडे न वळता शिक्षणाचे धडे फिरवावेत यासाठी एक प्रयोग सुरु केला आणि आता या प्रयोगाला चांगलेच यश मिळू लागले असून अशा मुलांना शिकवायला आता चांगल्या घरातील विद्यार्थिनी पुढे येऊन शिकवू लागल्या आहेत.