Delhi School Reopens :देशाच्या सहा राज्यांमध्ये वाजली शाळेची घंटा! महाराष्ट्रात शाळा कधी सुरू होणार?
प्रशांत कदम, एबीपी माझा | 02 Sep 2021 08:29 PM (IST)
शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन डोस पूर्ण करण्यात येतील तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यावेळी शाळा सुरू होतील त्यावेळी शिक्षकांचं लसीकरण पूर्ण झाल्यामुळे पालक देखील निश्चित होतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना अजित पवार म्हणाले की, राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशा सूचना देण्यात आल्या असून तसा निर्णय घेण्यात आला आहे.