Baramati Sayambachi Wadi | सायंबाच्या वाडीत बहरली हिरवाई, दुष्काळग्रस्त गाव बनलं पर्यटनस्थळ!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Dec 2020 07:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसायांबाची वाडी बारामती तालुक्यातील जिरायत भागातील गाव अशी या गावची ओळख होती. पण या गावात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम झालं आणि या गावाचं रूपच पालटलं. सध्या सायंबाची वाडी हे सध्या पिकनिक स्पॉट बनला आहे कारण तिथं असलेल्या तळ्यामुळे. दुष्काळी गाव अशी असलेली ओळख सायंबाचीवाडीने बदलून पाणीदार सायंबाची वाडी अशी ओळख निर्माण केली आहे. एखाद्या गावाने ठरवलं तर गावचा कायापालट कसा होऊ शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे सायंबाचीवाडी हे गाव. या गावचा आदर्श इतर गावांनी घेऊन आपली ओळख बदलावी हीच अपेक्षा.