Satara Pesticides Special Report : कीड नाशक औषधांमुळे साताऱ्यात दोन चिमुकल्यांनी गमावला जीव
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSatara Pesticides Special Report : कीड नाशक औषधांमुळे साताऱ्यात दोन चिमुकल्यांनी गमावला जीव
धान्य किडू नये म्हणून धान्यात टाकल्या जाणाऱ्या गोळ्यामुळे दोन चिमुकल्या सख्या बहिण भावाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. तर दोन चिमुकल्यांसह या चिमुकल्यांचे आई वडील आज्जी असे सर्वांवरच सध्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. कराड येथील मुंढे गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी अरविंद माळी यांचे मुंढे गावात रस्त्याकडेला छोटेसे घर आहे. त्यांना एक भाऊ असून त्यांच्यी दोन मुले आणि अरविंद यांची मुले यांचे आई वडिल आज्जी असे सर्वजन एका खोलीतच रात्री झोपली होते. झोपेत असताना या चार मुलांना उलट्याचा त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी या चौघांनाही तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र या चौघांपैकी श्र्लोक माळी या तीन वर्षाच्या बालकाचा आणि त्याची सात वर्षाची बहिण तनिष्का माळी असे एका पाठोपाठ एक असे दोघांचाही मृत्यू झाला. तर इतर दोघामुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर आज सकाळी मृत मुलांच्या आई वडिलांनाही याचा त्रास होऊ लागला तर त्यांच्या आज्जीलाही याचा त्रास होऊ लागल्यामुळे घरातील सर्वांनाच रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घरातील धान्यांसाठी सेल्फॉस ही पुडी आणून त्यांनी ती धान्यात ठेवली होती. आणि त्यातून जो काही विषारी वायू बाहेर पडला त्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे पोलिसांना कुटुंबीयांनी सांगितले. धान्याला किड लागू नये म्हणून अरविंद यांनी हे सेल्फाॕस आणले होते. ज्या रुममध्ये ही धान्याची पोती ठेवली होती त्याच रुममध्ये हे संपुर्ण कुटुंब झोपले होते. जेंव्हा या बंदिस्त असलेल्या रुममध्ये हा विषारी वायू पसरला तेंव्हा या रुममध्ये झोपलेल्या सर्वांनाच त्याचा त्रास झाला आणि आणि यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला.