महापुरातले देवदूत... वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवाची बाजी, माणसांसह जनावरांसाठीही आले मदतीचे हात
विजय केसरकर, एबीपी माझा | 26 Jul 2021 08:23 PM (IST)
मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील परिस्थिती बिकट बनली होती. नागरिकांच्या घरांचं, शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांची संसार उद्ध्वस्त झाले आहे. या नागरिकांना तातडीची मदत सरकारन जाहीर केली आहे.
ज्या नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले त्यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत सरकारने जाहीर केली आहे. तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजारांची मदत जाहीर केली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या मदतीची घोषणा केली आहे.