रत्नागिरीच्या लोटे MIDC मध्ये स्फोट,चार जणांचा मृत्यू,स्फोटांची मालिका कधी थांबणार? 6 महिने 6 स्फोट
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा | 19 Apr 2021 12:27 AM (IST)
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एम.आय.डि.सी मध्ये गेल्या तीन महिन्यांत तीन स्फोट झालेत. जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून माहिती घेत असून जखमींना तातडीची मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्या त्याठिकाणी जाऊन पहाणी करणार असून वारोवार होत असलेल्या अपघाताची कारण शोधणं गरजेचे आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना याठिकाणच्या केमिकल फॅक्टरीचं ऑडिट करण्याची विनंती करणार आहे. जेणेकरून त्यातील ज्या त्रुटी आहेत त्या समोर येतील किंवा त्या तंत्रज्ञान कालबाह्य झाल्यात का?हे सुध्दा समोर येईल. उद्या उदय सामंत स्वतः जाऊन त्याठिकाणची पहाणी करणार आहेत.