✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report

abp majha web team  |  06 Mar 2026 10:42 PM (IST)
ABP News

आपला नवा सर्वोच्च नेता कोण, याचं उत्तर इराणी जनतेला अजून मिळालेलं नाही... अयातुल्ला खामेनींचा उत्तराधिकारी नेमण्यासाठी युद्धाच्या छायेतही तेहरानमध्ये बैठका सुरू आहेत... पण निर्णय अजून झालेला नाहीये किंवा झाला असला, तरी जाहीर केलेला नाहीये. इराणमध्ये सध्या नेमकं काय घडतंय, बघुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये... 


अमेरिका-इस्रायलनं केलेल्या हल्ल्याच्या पहिल्या ३० सेकंदांत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाले... 


त्यानंतर आठवडा उलटला असला, तरी इराणनं त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केलेली नाही... 


किंवा निवड झाली असेल, तरी ते नाव अजून जाहीर केलेलं नाही.... 


कारण इस्रायल-इराणचे तेहरानवर हल्ले सुरूच असून नव्या नेत्याला लक्ष्य केलं जाण्याची इराणला भीती आहे... 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराणच्या अंतरिम काऊंसिलची गुरुवारी बैठक झाली... 


इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला... 


सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गुलाम होसेन मोहसेनी एजेई आणि हंगामी सर्वोच्च नेते अयातुल्ला अलिरेजा अराफी उपस्थित होते... 


सर्वोच्च नेत्याची निवड करण्यासाठी 'कमिटी ऑफ एक्सपर्टस्'ची बैठक बोलावण्यावर यावेळी चर्चा झाली... 


नव्या नेत्याचं नावही नक्की करण्यात आल्याची माहिती असून हे नाव एक्सपर्ट कमिटी आणि गार्डीयन काऊंसिलसमोर ठेवलं जाणार आहे... 


दिवंगत अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे... मात्र स्वतः खामेनी यांची आपला मुलगा सर्वोच्च नेता व्हावा, अशी इच्छा नव्हती. त्यांनी सुचवलेल्या तीन नावांपैकी त्यांचे पूर्वसुरी अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांचे नातू हसन खोेमेनी सध्या हयात आहेत. त्यामुळे या दोन नावांमधून एक्सपर्ट कमिटी आणि गार्डीयन काऊंसिसला एकाची निवड करायची असल्याचं समजतंय


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.