AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!

Continues below advertisement

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला! 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुंभेफळ गावातील सुकन्या सावंत या गृहिणीने महिला दिनाच्या निमित्ताने प्रेरणादायी कामगिरी केली आहे. घरबसल्या एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सिनेमा तयार केला आहे.
विशेष म्हणजे सुकन्या सावंत यांनी आपल्या दोन वर्षांच्या बाळाची जबाबदारी सांभाळत तब्बल आठ महिन्यांच्या मेहनतीनंतर हा सिनेमा पूर्ण केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शिवचरित्राची ओळख व्हावी या उद्देशाने त्या स्वतः गावोगावी शाळांमध्ये जाऊन हा सिनेमा चिमुकल्यांना दाखवत आहेत. 
तंत्रज्ञानाचा उपयोग करून इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न प्रेरणादायी आहे. या सिनेमाची निर्मिती कशी झाली आणि त्यासाठी कोणती आव्हाने पार करावी लागली, याविषयी सुकन्या सावंत यांच्याशी आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी संवाद साधला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola