Danve VS Abdul Sattar : दानवेंचा पराभव, कुणावर खापर? आरोपांमुळे सत्तारांची कोंडी? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे मंत्री आणि शिंदे गटाने नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यातील वाद गेल्या काही दिवसात विकोपाला गेला आहे. असे असतानाच सत्तारांचा मतदारसंघ असलेला सिल्लोड हा पाकिस्तान होत चाललाय अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल केला. माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात दानवेंनी सत्तारांविरोधातील खदखद बोलून दाखवली आणि नव्या वादाला तोंड फुटले, त्यामुळे खरचं सिल्लोडच पाकिस्तान होतंय का? पाहू या संदर्भातील माझाचा स्पेशल रिपोर्ट.
दानवे-सत्तार वाद जुनाच
सिल्लाडचे आमदार तथा मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवेंमध्ये नवा वाद तसा जुनाच. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. आणि याचं कारण ठरलंय दानवेंचा जालना लोकसभा मतदारसंघातून झालेला पराभव. सिल्लोड विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो. पण सत्तार यांनी दानवेंचा प्रचार न करता काँग्रेसचा उमेदवार निवडून आणल्याचा आरोप होत आहे. यावरूनच रावसाहेब दानवे यांनी सत्तार यांच्यावर हल्लाबोल करताना सिल्लोडचा पाकिस्तान होत असल्याचा आरोप केला.
त्यावर बोलताना अब्दुल सत्तारांनीही पलटवार केलाय. सिल्लोडला बदनाम कारण योग्य नाही, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यचा परिणाम भाजपला भोगावे लागतील असा थेट इशाराच सत्तारांनी दिला