Rajkiya Shole | Jaykumar Gore | कचाट्यात गोरे, पवारेंचे मोहरे? गोरेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानात
Rajkiya Shole | Jaykumar Gore | कचाट्यात गोरे, पवारेंचे मोहरे? गोरेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानात
एका महिलेला नग्न फोटो पाठविल्याच्या आरोपावरून वादात सापडलेल्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुफानी टोलेबाजी करत आपल्यावरील आरोपांना जोरदार उत्तर दिले. माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही .. मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात आणि काळया भावल्या बांधत आलेत . मात्र जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा केल्या आणि कितीही बाहुल्या बांधल्या तरी माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही असा इशारा जयकुमार गोरे यांनी दिला. माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपच्या शाखा उद्घाटन समारंभात काल रात्री जयकुमार गोरे बोलत होते. या कार्यक्रमात गोरे यांनी मोहिते पाटील यांना दे धक्का करीत पिलीव येथील जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते आणि मोहिते गटाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. यावेळी माढ्याचे माजी खासदार रणजीत निंबाळकर आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते .
जया भाऊ या कार्यक्रमात काहीतरी नक्की बोलणार अशी लोकांची अपेक्षा होती. त्यानुसार गोरे यांनी या सर्व प्रकरणावर सडकून टीका करत मला ज्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला माझ्या विरोधात काळया भावल्या बांधल्या त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. एक साध्या घरातलं पोरगं तीन वेळा आमदार झाले हे ज्यांना पाहवत नाही अशी ही मंडळी असून माझी एकही निवडणूक झाली नाही. निवडणूक आली की माझ्यावर केसेस होणे ही दर वेळची गोष्ट बनली आहे. माझ्या मतदारसंघातील जनतेलाही आता याची सवय झाली असून ते म्हणतात कितीही केसेस होऊ द्या असे सांगत गोरे यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. अडवून अडवून गडी पडलं, अडवून आडवून गडी दमलं पण मी कधी थांबलो नाही असा टोलाही गोरे यांनी लगावला.