Raigad Irshalwadi Landslide Specail Report:इर्शाळवाडीची झाली दफनभूमी,दु:खाचा डोंगर.. नेमकं काय घडलं?
abp majha web team
Updated at:
20 Jul 2023 09:41 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउशाला ३ हजार ७०० फूट उंचीचा अवाढव्य इर्शाळगड आणि पायाशी ११ हजार २२० फूट लांबीचं विशाल मोरबे धरण... आजूबाजूला घनगर्द झाडी... एखाद्या हिरव्यागार द्रोणात अलगद ठेवली असावी अशी इर्शाळवाडी... अंगावर सौंदर्याची शाल पांघरलेल्या याच इर्शाळवाडीला जणू नजर लागली... आणि ती लावली ज्याने पिढ्यानपिढ्या आधार दिला त्या इर्शाळगडाने... ज्याने इर्शाळवाडीला आधाराची सावली दिली.. जणू तीच सावली कोपली... आणि महाभयंकर आक्रित घडलं... इर्शाळगडाची एक दरड कोसळली आणि तिने इर्शाळवाडीला कवेत घेतलं... घरं दबली, संसार मोडून पडले आणि आता उरलेत फक्त घरांचे सांगाडे... हलकल्लोळ... आक्रोश आणि अश्रूंचे पाट... पाहूयात मृत्यूलाही कंप फुटायला लावणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ही दुर्घटना नेमकी घडली कशी...