Rahul Solapurkar : प्रसिद्धीसाठी राहुल सोलापूरकर बरळले? नेमकं काय बोलले? Special Report

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता राहुल सोलापूरकरांच्या विधानावरुन सध्या मोठा वाद निर्माण झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेबाबत सोलापूरकरांनी हे विधान केलं होतं. एका पॉडकास्टमध्ये सोलापूरकरांनी केलेल्या या विधानामुळे शिवप्रेमी चांगलेच संतापले. इतकंच नव्हे तर सर्वपक्षीय नेत्यांकडूनही या विधानाचा समाचार घेण्यात आला. पाहूयात नेमकं काय आहे हे प्रकरण....
राहुल सोलापूरकरांचं वादग्रस्त विधान
“छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते, पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. मोहसीन खान किंवा मोईन खान या औरंगजेबाच्या सरदाराकडून महाराजांनी सही शिक्क्याचं पत्र घेतलं होतं. आणि त्याच्याच आधारे महाराज आग्र्यातून बाहेर पडले.”
सोलापूरकरांनी हे वादग्रस्त विधान केलं
आणि त्याचे पडसाद राज्यातल्या अनेक भागात उमटले...
पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेसमोर मोठं आंदोलन करण्यात आलं...
सोलापूरकर यांच्या या विधानाचा
विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांनीही समाचार घेतला...
राजकीय नेतेमंडळींसह सोलापूरकर यांच्या विधानामुळे
इतिहास अभ्यासकांनीही संताप व्यक्त केला...
सोलापूरकर यांनी हे विधान कोणत्या आधारावर केलं असा थेट सवाल
इंद्रजीत सावंत यांनी केलाय...
गेली अनेक वर्ष मराठी चित्रपट
आणि मालिकांमध्ये राहुल सोलापूरकर काम करतायत...
राजर्षी शाहू मालिकेत त्यांनी साकारलेली शाहू महाराजांची भूमिका बरीच गाजली होती....
पण याच सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांबद्द्ल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वादाचा पिक्चर सुरू झालाय
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फुले दाम्पत्य, महात्मा गांधी या थोर पुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून फुकटची प्रसिद्धी मिळवण्याची सध्या फॅशन आहे...
राहुल सोलापूरकरांचं वक्तव्य त्यासाठी तर नव्हतं ना असा प्रश्न अनेकजण विचारताहेत
कोल्हापूरहून विजय केसरकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे