Washim Special Report : जैन धर्मियांमध्ये राडा, श्वेतांबर आणि दिगंबर पंथियांमध्ये तुफान हाणामारी
abp majha web team | 19 Mar 2023 11:53 PM (IST)
जैन धर्मात अहिंसेची शिकवण दिली जाते. अहिंसेची शिकवण देणाऱ्या याच जैन धर्मियांमध्ये तुफान हाणामारी सुरु आहे. जैन धर्मियांची काशी अशी ओळख असलेल्या वाशिमच्या शिरपूरमध्ये जैन धर्मियांमध्ये जोरदार राडा सुरु आहे. श्वेतांबर आणि दिगंबर पंथियांमधली धुसफूस काही केल्या कमी होत नाहीये.. ४२ वर्षानंतर भगवान पार्श्वनाथांच्या मंदिराचं दार उघडलं..असं वाटलं होतं की जुना वाद मिटेल. पण तसं काहीच झालं नाही..हा वाद मिटण्याऐवजी अधिकच पेटलाय. आणि आता तर तो थेट हाणामारीपर्यंत पोहोचलाय. पाहूया.