Queen Elizabeth : अशी होती महाराणी, अलविदा महाराणी एलिझाबेथ Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांना उद्या अखेरचा निरोप देण्यात येणार आहे... तत्पूर्वी सेंट्रल लंडनमधल्या वेस्ट मिनिस्टरमध्ये राणीचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय.. आपल्या लाडक्या राणीच्या अंत्यदर्शनासाठी लाखो नागरिकांनी रांगा लावल्यात... राणीचं अंतिम दर्शन घेण्यासाठी तब्बल १६ किमीपेक्षा मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळालं. बारा बारा तास रांगेत उभं राहिल्यानंतर नागरिकांना राणीचं दर्शन घ्यायला मिळतंय.., सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनीही रांगेत उभं राहून राणीचं अंत्यदर्शन घेतलं...यांत इंग्लंड फुटबॉल संघाचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅमनं तब्बल तेरा तास रांगेत उभं राहून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं अंत्यदर्शन घेतलं. बेकहॅमला त्याच्या कारकीर्दीत राणीला भेटण्याची अनेकदा संधी मिळाली होती. त्यामुळं शवपेटीनजिक येताच बेकहॅमचं मन त्या भेटींच्या आठवणींनी दाटून आलं. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले... दरम्यान उद्या होणाऱ्या अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी अनेक देशांचे प्रमुख लंडनमध्ये पोहोचलेत..