Pune Porsche Car Accident : ससूनचा 'राक्षस' पैशाची हाव, कारवाईचं इंजेक्शन Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातल्या पोर्शे कार अपघाताप्रकरणी ससूनमधला डॉक्टर अजय तावरे सध्या पोलीस कोठडीची हवा खातोय.ससूनमध्ये भ्रष्टाचाराची गंगा आणणारा हा अजय तावरे नेमका कोण आहे? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. एबीपी माझानं खोलात जाऊन त्याची कुंडलीच बाहेर काढलीय. ती पाहून या तावरेचा कोणी तरी बडा गॉड फादर असावा या मतापर्यंत आम्ही आलोय. पाहा हा स्पेशल रिपोर्ट...
मुंबईच्या जे.जे.वैद्यकीय महाविद्यालयातून २००६ साली तावरे डॉक्टर झाला. २००७ साली त्याला ससून रुग्णालयात नोकरी मिळाली.ससूनमध्ये काही महिन्यांतच त्यानं मेडिकल रिपोर्टमध्ये फेरफार करायला सुरुवात केली आणि लाखोंची माया गोळा केली. पण त्याच्या या कारनाम्यांची माहिती कळताच २००८ मध्ये तावरेला अंबेजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवलं. पण तावरे बिचकला नाही. त्यानं योग्य ठिकाणी जॅक लावला आणि पुन्हा ससूनमध्ये स्वतःची बदली करुन घेतली.बदलीच्या कारवाईनंतरही तावरेत बदल झाला नाही. २०१२मध्ये एका शवविच्छेदन अहवालात फेरफार केल्याचा तावरेवर आरोप झाला.पण त्याचा तावरेवर काही परिणाम झाला नाही. उलट २०१३ मध्ये त्याला ससूनमध्येच प्रशासकीय अधिकारी बनवले आणि नंतर तर तो उप अधीक्षक पदावर पोचला.दोन वर्षातच म्हणजे २०१५ मध्ये या महाभागानं वैद्यकीय अधीक्षकपदसुद्धा बळकावलं. मग काय रिपोर्ट बदलण्याची गोष्ट त्याला छोटी वाटू लागली. अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्य पदावर असताना तावरेवर किडनी तस्करीचा आरोप झाला. ससूनच्या प्रशासनाला हे प्रकरण गंभीर वाढलं आणि तावरेची अधीक्षक पदावरून उचलबांगडी केली गेली. ही घटना २०२२ ची. तावरेनं पुन्हा आपलं राजकीय वजन वापरुन वर्षभरातच पुन्हा अधीक्षकपद मिळवलं. या कामात त्याला अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंची शिफारस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मेहेरबानी कामाला आली. एवढं होऊनही तावरेची बेफिकीरी काही कमी झाली नाही. पैशाला चटावलेल्या माणसाला कामाची काही पर्वाच नव्हती.तो अधीक्षक असताना ससूनच्या आयसीयू मध्ये एका रुग्णाला चक्क उंदीर चावला अन तावरेची पुन्हा हकालपट्टी झाली. पण ही हकालपट्टीही तावरेनं आपल्या पथ्यावर पाडून घेतली.